Saturday, July 24, 2010

कधी असेही जगून बघा…..

max


माणूस म्हणून जगताना
हा एक हिशोब करुन तर बघा!
“किती जगलो” याऐवजी “कसे जगलो”?
हा एक प्रश्न जरा मनाला विचारुन तर बघा!
कधी असेही जगून बघा….

कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी
समोरच्याचा विचार करुन तर बघा!
तर कधी कोणाच्या हास्यासाठी,समाधानासाठी
न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा!
कधी असेही जगून बघा…..

संकटांमुळे खचून जाणारे तर शेकडोंनी मिळतात
कधीतरी अडचणींवर मात करण्याची हिम्मत दाखवुन तर बघा!
स्वतःपुरता विचार तर नेहमीच करतो आपण
कधीतरी बुडत्या्साठी काठीचा आधार होउन तर बघा!
कधी असेही जगून बघा…..

वर्तमान आणि भवि्ष्याची चिंता तर सदाचीच असते
कधीतरी भूतकाळाच्या वि्श्वात गुंगून तर बघा!
काळाची वाळू हातातुन निसटली म्हणुन काय झाले?
आधी अनुभवलेला क्षण पुन्हा एकदा जगून तर बघा!
कधी असेही जगून बघा…..

प्रतिसादाची काळजी का करावी नेहमी?
एखाद्यावर जिवापाड,निर्मळ,एकतर्फी प्रेम करुन तर बघा!
ज्या प्रेमाबद्दल सर्व जग कुतूहल करते
त्या अथांग भावनेची व्याख्या करुन तर बघा!
कधी असेही जगून बघा…..

अतिसामान्य जीवन नशीबी असले म्हणून काय झाले?
कधीतरी सामान्यातले असामान्य होण्याची जिद्द दाखवून तर बघा!
चिमणीसारखा जन्म मिळाला असला तर काय झाले?
आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करुन तर बघा!
कधी असेही जगून बघा…..

आयुष्य रोजच वेगवेगळे रंग उधळते
त्या रंगांमधे आनंदाने रंगून तर बघा!
तसे जगायला काय?कुत्रे-मांजरीही जगतात हो
कधीतरी माणूस म्हणुन स्वतःच्या जगण्याचा उद्देश शोधून तर बघा!
कधी असेही जगून बघा…..

मैत्री म्हटली की…

Frnds

मैत्री म्हटली की

आठवतं ते बालपण
आणि मैत्रीतुन मिळालेलं
ते खरंखुरं शहाणपण

कोणी कितीही बोललं तरी
कोणाचं काही ऐकायचं नाही
कधीही पकडले गेलो तरी
मित्रांची नावं सांगायची नाही

मैत्रीचं हे नातं
सगळ्या नात्यांत श्रेष्ठ
हे नातं टिकवण्यासाठी
नकोत खुप सारे कष्ट

मैत्रीचा हा धागा
रेशमापेक्षाही मऊ सुत
मैत्रीच्या कुशीतच शमते
मायेची ती सुप्त भुक

मैत्रीच्या सहवासात
श्रम सारे विसरता येतात
पण खरे मित्र मिळवण्यासाठी
काहीदा कितीतरी पावसाळे जातात

मैत्री म्हणजे
रखरखत्या उन्हात मायेची सावली
सुखाच्या दवात भिजुन
चिंब-चिंब नाहली

मैत्रीचे बंध
कधीच नसतात तुटणारे
जुन्या आठवणींना उजाळा देउन
गालातल्या गालात हसणारे…

Bayko/Ardhangini ani Aai ani Sun ani mulgi ani employee ani...

हे वास्तवही लक्षात घे...
'
बायको नोकरी करणारी असावी, ती स्मार्ट असावी, चारचौघींत उठून दिसावी' अशी तमाम नवरेमंडळींची इच्छा असते. यासोबत तिने 'गृहकृत्यदक्ष'आणि 'आदर्श सून' असणंही मस्ट असतं. पण, तीही आपल्यासारखी एक माणूस आहे. तिच्या भावभावना, इच्छा-आकांक्षा, तिची परिस्थिती कशीअसू शकते, याकडे मात्र या नवरेलोकांचं दुर्लक्ष होतं. नवऱ्याचा बायकोकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा...
.. .. .. .. .. ..

-
उद्या कदाचित तुझं नोकरी करणाऱ्या मुलीशी लग्न होईल. त्यावेळी जरा हे वास्तवही लक्षात घे.
-
ती तुझ्याएवढीच शिकलेली असेल. तुझ्याएवढाच पगार कमावत असेल.
-
तीदेखील तुझ्यासारखीच व्यक्ती असेल, त्यामुळे तिचीही स्वप्नं असतील, आवडी असतील,
-
तिनेही आतापर्यंत कधीच किचनमध्ये पाऊल टाकलं नसेल, अगदी तुझ्यासारखंच किंवा तुझ्या बहिणीसारखं...
-
तीसुद्धा अभ्यासात बिझी असेल आणि मुलगी म्हणून कसलीही सवलत देणाऱ्या या स्पधेर्च्या युगात पुढे जाण्यासाठी धडपडत असेल, अगदीतुझ्यासारखीच!
-
तिनेही तुझ्याप्रमाणेच वयाची २०-२५ वर्षं आई, बाबा, बहीण, भाऊ यांच्या प्रेमाच्या सान्निध्यात घालवली असतील,
-
आणि तरीही हे सारं मागे सोडून, तिचं घर, प्रेमाची माणसं यांना दूर करून ती तुझं घरं, तुझं कुटुंब, तुमच्या रितीभाती स्वीकारायला आली असेल.
-
पहिल्याच दिवशी तिने मास्टर शेफप्रमाणे स्वयंपाक करावा अशी सगळ्यांची अपेक्षा असेल,
-
नेहमीच्या बेडवर तुम्ही डाराडूर झोपलेले असताना ती मात्र सर्वस्वी अनोळख्या असलेल्या वातावरणाशी, अनुभवांशी आणि किचनशी जुळवूनघेण्याचा प्रयत्न करत असेल.
-
सकाळी उठल्याबरोबर तिने चहाचा कप हातात द्यावा आणि रात्रीचं जेवणही तिच्याच हातचं असावं अशी अपेक्षा असेल,
-
तिलाही ऑफिसच्या कामाच्या डेडलाइन पाळताना उशीर होत असेल,
-
तीसुद्धा कंटाळली असेल, कदाचित तुमच्यापेक्षा थोडी जास्तच, तरीही तिने तक्रारीचा सूर लावू नये असंच तुम्ही म्हणाल.
-
नोकर, स्वयंपाकी, बायको... यापैकी तिला एखादी भूमिका करायची नसली तरीही...
-
आणि त्यातही तुमच्या तिच्याकडून काय अपेक्षा आहेत हेदेखील शिकण्याचा ती प्रयत्न करत राहील...
-
तीसुद्धा थकते, कंटाळते...
-
पण सतत टुमणं लावू नये आणि तुझ्यापेक्षा पुढे जाऊ नये या अपेक्षाही तिला माहिती असतात.
-
तिचा स्वत:चा कंपू असतो, त्यात मित्रंही असतात आणि तिच्या ऑफिसमधले पुरुष सहकारीही... तरीही ईर्ष्या, अनावश्यक स्पर्धा आणिअसुरक्षिततेच्या भावनेने तुमच्या मनात घर करू नये म्हणून ती बालमित्रांपासूनही दूर राहते.
-
कदाचित तिलाही लेट नाइट पाटीर्त जायला, धमाल करायला आवडत असेल, पण तुम्हाला आवडणार नाही म्हणून तू सांगितलेलं नसतानाही तीतसं करत नाही.
-
स्वत:कडून पूर्ण प्रयत्न करून ती हे नातं सुंदर करेल. तू मदत केली आणि विश्वास ठेवला तर हे नातं जीवनातलं सर्वाधिक यशस्वी शिखर गाठूशकेल.
-
या अनोळखी घरात केवळ तू एकच तिच्या ओळखीचा, जवळचा आहेस, त्यामुळे तुझी मदत, संवेदना आणि सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजेअण्डरस्टॅण्डिंग आणि प्रेम मिळावं, अशी तिची अपेक्षा असेल.

पण अनेक जण हे समजूनच घेत नाहीत...

Got this from Jayshree ........

Asa Jagala Pahije

Ase hotay kahitari.






रोज काही लिहीत रहावे
आहे असे काहीसे ठरवले…
पुन्हा प्रयत्न करायचा,
मिळवायचे जे जे हरवले….

होती कधी सवय मला
फक्त कवितेतून बोलायची..
जे जे यायचे मनी ते
यमकातून मांडायची…

पण आता आहे प्रश्न पडला
यमके कशी जुळवायची ?
मनीच्या भावांची कवितेतून
भट्टी कशी जमवायची